घरपोच दारुची सुविधा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण !

घरपोच दारुची सुविधा करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण !

मुंबई – राज्यात घरपोच दारुची सुविधा सुरु करण्याचा विचार सरकार करत असल्याचं बोललं जात होतं. परंतु याबाब मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे. अशा स्वरुपाचा कोणताही निर्णय राज्य सरकारने घेतलेला नाही आणि घेणारही नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मद्यप्राशन करुन वाहन चालवल्याने होणारे रस्ते अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारने घरपोच दारुची सुविधा सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वी प्रकाशित झाले. परंतु मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

दरम्यान ही बातमी पसरल्यानंतर अनेक, संघटना आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती.तसेच उत्पादनशूल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये या निर्णयासाठी सरकार अनुकूल असल्याचे म्हटल्याने राज्य सरकारच्या अडचणीत भर पडली होती. ज्या पद्धतीने इ-कॉमर्स वेबसाइट इतर वस्तू घरपोच करतात. त्याच माध्यमातून दारुही घरपोच पुरवण्यात येईल, असं बावनकुळे यांनी म्हटले होते. त्यामुळे सरकारच्या अडचणीत चांगलीच भर पडली होती. परंतु याबाबत सरकारनं कोणताही निर्णय घेतला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS