पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं, मुंबई, नागपूरऐवजी या ठिकाणी होणार अधिवेशन?

पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं, मुंबई, नागपूरऐवजी या ठिकाणी होणार अधिवेशन?

मुंबई –  कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पावसाळी अधिवेशन पुढे ढकललं आहे. येत्या 22 जून रोजी हे अधिवेशन घेतलं जाणार होतं. मात्र कोरोनाचे संकट पाहता हे अधिवेशन  3 ऑगस्टला घेतलं जाणार आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी  माहिती दिली आहे. या निर्णयाला विरोधकांनी पाठिंबा दर्शवला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव होता, त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा दिला, शिवाय पुरवणी मागण्यांसाठी जर एखादं दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकराचं नियोजन असेल, तर त्यालाही पाठिंबा असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंत्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कोरोनाचे संकट कायम असताना सत्ताधारी आणि विरोधांमध्ये आरोप-प्रत्यरोप सुरू झालेत. कोरोनामुळे गरीब, कामगारांचा प्रश्‍न मोठा झाला असून रुग्णसंख्याही वाढत आहे. यातच कोकणात वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे विरोधक हा मुद्दा उचलून धरण्याची शक्यता आहे.

तसेच पावसाळी अधिवेशन मुंबई, नागपूरमध्ये घेण्याऐवजी नाशिक जिल्ह्यात घेण्याचा विचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इतगपुरी येथे हे अधिवेशन घेण्याबाबतचा विचार शासनस्तरावर सुरू असल्याची माहिती आहे.

COMMENTS