काँग्रेसला शरद पवारांसारखा मोठा वकिल लाभलाय – मुख्यमंत्री

काँग्रेसला शरद पवारांसारखा मोठा वकिल लाभलाय – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार हे काँग्रेसची वकिली करत असून काँग्रेसला त्यांच्यासारखा मोठा वकिल लाभला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच पवारांनाही काँग्रेसची वकिली करण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान शरद पवार यांनी काँग्रेसची बाजू घेत भाजप सरकारवर टीका केली होती. देशात अनेक पंतप्रधान होऊन गेले. त्यांनी विरोधकांना संकटात आणण्यासाठी कधीही सत्तेचा गैरवापर केला नाही. सध्याचे सरकार मात्र विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर करून घेत आहे. अगुस्ता वेस्टलँड हेलिकॅप्टर खरेदी गैरव्यवहारात युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतले जात असून, विरोधकांना संपविण्याचा हा सरकारचा कट असल्याचं पवारांनी म्हटलं होतं. त्यावरुन मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीका केली असून शरद पवार हे काँग्रेसची वकिली करत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

 

COMMENTS