सरकार स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य !

सरकार स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य !

मुंबई – आम्ही सरकार लवकरच स्थापन करू आणि स्थिर सरकार देऊ, भाजप नेतृत्वातच सरकार स्थान होईल,शपदविधीचा मुहूर्त अजून काढायचा आहे मी 5 वर्षे मुख्यमंत्री पदावर राहीन यामध्ये मला कोणतीही शंका नाही. अमित शाह उद्या येणार नाहीत, शिवसेना भाजपमध्ये अधिकृत आणि अनधिकृत अशी चर्चा सुरू आहे.
असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.तसेच भाजप विधिमंडळ बैठकीत उद्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे, निडवणूक निरीक्षक भुपेंद्र यादव हे उपस्थित राहणार आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा या निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या यावेळी ते बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी शरद पवार यांनी टोला लगावला असून पावसात भिजाव लागतं यामध्ये आमचा अनुभव कमी पडला असल्याचं म्हटलं आहे. सामनामध्ये येणाऱ्या गोष्टी यांचा चर्चेसाठीचा रोल नसतो, तर चर्चा derail करण्यासाठी असतो असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

तसेच निवडणुकीदरम्यान बुलडाण्यातील खामगाव येथे एका तरुण शेतकय्रानं भाजपचे छापील कपडे घालून आत्महत्या केली होती. यावरही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं असून भाजपचे कपडे घालून ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या बायकोने स्वतः सांगितले की घरगुती कारणावरून ही घटना घडली आहे. असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

COMMENTS