काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकरांनी फोडला, आपच्या विजयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया!

काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकरांनी फोडला, आपच्या विजयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया!

मुंबई – दिल्ली विधानसभेचे निकाल हाती येत असतानाच याचे निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. दिल्लीकरांनी पुन्हा एकदा आपला नेता म्हणून ‘आप’चे प्रमुख आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीच निवड केली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री म्हणून केजरीवाल यांना तिसरी संधी मिळणार आहे. आप ६३ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप ७ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपला मोठा पराभवाचा धक्का बसला आहे. ‘आप’ने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं विधानसभा निवडणुकीतील विजयाबद्दल कौतुक केलं आहे. दिल्लीकर जनतेचे आणि अरविंद केजरीवाल यांचे मी महाराष्ट्रातर्फे आणि शिवसेनेतर्फे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांच्या भावी विकासमय वाटचालीस शुभेच्छा देतो.” अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तसेच आपण म्हणजेच देशप्रेमी आणि आपल्याला विरोध करणारे देशद्रोही हा काहींच्या मनातील भ्रमाचा भोपळा दिल्लीकर मतदारांनी फोडला, असा हल्लाबोलही उद्धव ठाकरेंनी केला आहे.

COMMENTS