लोकसभेसाठी शिवसेना-भाजपचा मास्टरप्लॅन, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर पार पडली बैठक !

लोकसभेसाठी शिवसेना-भाजपचा मास्टरप्लॅन, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर पार पडली बैठक !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्रीवर बैठक पार पडली. या बैठकीला आदित्य ठाकरे, सुभाष देसाई, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित होते.
रात्री 11 ते 1 अशी सुमारे दोन तास ही चर्चा झाली असून निवडणूक प्रचाराच्या समनव्याबद्दल, रणनीतीबद्दल चर्चा झाली असल्याची माहिती आहे.

दरम्यान या बैठकीत संयुक्त प्रचार मेळाव्यांच्या तारखा आणि ठिकाणांवर चर्चा झाली असून सहा संयुक्त प्रचार मेळाव्यांच्या वेळापत्रकाबद्दल निश्चिती करण्यात आली आहे. या मेळाव्यातून शिवसेना-भाजपची युती झाली आहे हे सांगण्याकरता, कार्यकर्त्यांना पटवून देण्याकरता लोकांसमोर एकत्रित जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.

मेळाव्याचं वेळापत्रक!

15 मार्च :
दुपारी – अमरावती
संध्याकाळी – नागपूर

17 मार्च :
दुपारी – औरंगाबाद
संध्याकाळी – नाशिक

18 मार्च :
दुपारी – नवी मुंबई
संध्याकाळी – पुणे

दरम्यान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या चार संयुक्त सभा होणार असून या सभा मुंबई, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात होणार आहेत.तर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या जवळपास 12 संयुक्त सभा होणार आहेत.

COMMENTS