मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचं ऐका – उद्धव ठाकरे

मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचं ऐका – उद्धव ठाकरे

मुंबई – इकडे चला हवा येऊ द्या आधीपासूनच सुरु आहे, मी मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतो, तुम्ही होम मिनिस्टरचं ऐका असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून गप्पा मारल्या. घरातील एसी बंद ठेवा, कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू बंद होणार नाहीत, त्यामुळे साठा करु नका असंही ते म्हणाले.

दरम्यान सर्वांना कोरोना व्हायरसच्या गांभीर्याची कल्पना आली आहे. घराबाहेर पडू नका. या संकटाची तुलना मी जागतिक युद्धाशी केली आहे. 1971 चे युद्ध आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शत्रू दिसत नसल्याने हल्ला कुठून होईल माहीत नसते. म्हणून आपण घरात राहिलं पाहिजे. घरातून बाहेर पडलो की शत्रू घरात येईल.कोणत्याही परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू, प्राण्यांचे खाद्यपदार्थांचा साठा करु नका, रुग्णालये, जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालूच राहतील. असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

तसेच ज्यांचे हातावरचे पोट आहे, त्यांची काळजी घेऊ, उद्योजक स्वत:हून पुढे येत आहे. कंपनी, कारखाने बंद आहेत, त्या उद्योजकांना हातावरचे पोट असणाऱ्यांचे किमान वेतन कापू नका, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

COMMENTS