ठाकरे सरकारनं घेतला आणखी एक मोठा निर्णय !

ठाकरे सरकारनं घेतला आणखी एक मोठा निर्णय !

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने देवेंद्र फडणवीसांच्या काळातील प्रकल्पांचा फेरआढावा घेण्याचा निर्णय घेतला. यापैकी काही प्रकल्प रद्दही करण्यात आले आहेत. त्यानंतर आता ठाकरे सरकारने फडणवीसांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची बदली केली आहे. तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी महत्त्वाची बदली म्हणजे मुंबई महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची बदली आहे. अश्विनी जोशी या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल महापालिका मुख्यलयात समन्वय समित्यांची एकत्रित बैठक घेऊन अवघे 24 तास उलटत नाहीत, तोपर्यंत जोशी यांची अचानक बदली केली आहे. त्यांची राज्य शासनाच्या समग्र शिक्षा अभियानात प्रकल्प संचालक पदावर नेमणूक करण्यात आली आहे. तर अश्विनी जोशींच्या जागी एस. एम. काकाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबरोबरच सहआयुक्त सुमन चंद्रा यांची बुलडाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.

COMMENTS