मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आणखी एक घोषणा, राज्यातील लाखो नागरिकांना होणार फायदा!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आणखी एक घोषणा, राज्यातील लाखो नागरिकांना होणार फायदा!

मुंबई – मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच राज्यातील नागरिकांच्या हिताचे अनेक निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतले आहेत. या निर्णयांमध्ये आणखी एक भर पडली असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची स्थापना आता जिल्हास्तरावर करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. याबाबतची घोषणा लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत. याआधी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष हा मुंबई आणि नागपूर या दोनच ठिकाणी होता. साधा अर्ज करण्यासाठी या दोन्ही ठिकाणी गरजूंना हेलपाटे घालावे लागत होते. परंतु आता जिल्हास्तरावरच अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याने गरजूंचा मनस्ताप कमी होणार असून त्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

दरम्यान दोन दिवसापूर्वीच वेळेवर
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी न मिळाल्यामुळे प्रियांका गुप्ता या महिलेनं ममत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केली होता. तिचा पती गेले काही वर्षांपासून आजारी आहे. त्यांच्या उपचारांचा खर्च हाता बाहेर गेल्यामुळे तीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यात दिरंगाई होत असल्यामुळे तिने हे पाऊल उचललं होतं. त्यामुळे गरजूंना वेळेवर निधी मिळावा या हेतुने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाऊल उचललं असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाची स्थापना आता जिल्हास्तरावर करण्याचा निर्णय घेतला आहे.

COMMENTS