धनंजय मुंडेंच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उमेदवारी ?

धनंजय मुंडेंच्या रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना उमेदवारी ?

मुंबई – महाराष्ट्रात विधान परिषदेच्या एका रिक्त जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. विधान परिषद सदस्य धनंजय मुंडे विधानसभेवर निवडून गेल्याने ही जागा रिक्त झाली आहे. 7 जुलै 2022 पर्यंत या जागेची मुदत असल्याने ही पोटनिवडणूक होणार आहे.या जागेसाठी 24 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 24 जानेवारीलाच निकालही जाहीर होणार आहे. यासाठी 7 जानेवारीला अधिसूचना निघणार आहे. तर 14 जानेवारी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असणार आहे. 15 जानेवारीला अर्ज छाननी होणार असून 17 जानेवारी पर्यंत अर्जमाघारीची अंतिम मुदत असणार आहे.

दरम्यान या जागेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उमेदवारी स्वीकारणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.सध्या उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असून त्यांना महाराष्ट्र विधिमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहाचे सदस्य असणे बंधनकारक आहे. अशात ते विधानसभेवर निवडून आले नसल्याने त्यांना विधानपरिषदेवर आमदार होणे आवश्यक असून ते धनंजय मुंडे यांच्या जागी उमेदवारी स्वीकारणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

COMMENTS