मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल, एका जागेच्या बदल्यात काँग्रेसच्या ‘या’ मागण्या मान्य!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल, एका जागेच्या बदल्यात काँग्रेसच्या ‘या’ मागण्या मान्य!

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते उपस्थित होते. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरेही उपस्थित होते.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणूक रिंगणात असल्याने ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा आग्रह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा होता. ही निवडणूक बिनविरोध करायची झाल्यास महाविकास आघाडीला पाच उमेदवार निवडणूक रिंगणात उतरावे लागणार होते. यात शिवसेनेच्या वाट्याला दोन राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या वाट्याला दोन आणि काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येत होती. मात्र काँग्रेसने काल आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले होते. त्यानंतर काँग्रेसने शेवटच्या क्षणी एक जागा लढवण्याचा मान्य केलं आहे. त्यामुळे काँग्रेस आता विधानपरिषद निवडणुकीत एकच उमेदवार उतरणार आहे. राजेश राठोड हे काँग्रेसतर्फे अर्ज भरणार आहेत तर पापा मोदी हे अर्ज भरणार नाहीत. या बदल्यात काँग्रेसच्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

काँग्रेसच्या या मागण्या मान्य

काँग्रेसचा यापुढे सत्तावाटपात
सन्मान राखला जाणार. सत्ता वाटपात संख्याबळाचा विचार केला जाणार नाही.

सत्तेतील सर्व पदांचं वाटप तीनही पक्षात समान होणार

महामंडळाचे वाटप, यापुढील सर्व विधानपरिषदेच्या जागांचं समान वाटप क्लं जाणार

शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद असल्याने सध्या शासनाच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा आहे, यापुढे मात्र निर्णय प्रक्रियेत काँग्रेसलाही सामावून घेतले जाणार. त्यांचा सन्मान केला जाणार.

COMMENTS