बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवडायचं झालं तर मी रिक्षाच निवडेन, या रिक्षाची स्टेअरिंग माझ्याकडे – उद्धव ठाकरे

बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवडायचं झालं तर मी रिक्षाच निवडेन, या रिक्षाची स्टेअरिंग माझ्याकडे – उद्धव ठाकरे

मुंबई – महाविकास आघाडी सरकार हे रिक्षासारखंच आहे.रिक्षा हे गरिबांचं वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवडायचं झालं तर मी रिक्षाच निवडेन. या रिक्षाची स्टेअरिंग माझ्याकडे आहे, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष पाठीमागे बसले असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहो. शिवसेना नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊतांनी घेतलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध करण्यात आला. या मुलाखतीत ते बोलत होते.

दरम्यान मी लोकांसोबत असल्याने
माझं मत बुलेट ट्रेन नको हे आहेच, पण आतासुद्धा सगळ्यांच्या मताने बुलेट ट्रेन नको असेल तर मी नाही करणार. म्हणून तीन चाकं तर तीन चाकं. ती चालताहेत ना एका दिशेने. मग तुमच्या पोटात का दुखतंय! केंद्रात किती चाकं आहेत? आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षांचं सरकार आहे ते मला माहित आहे. मी जेव्हा गेल्या वेळी एनडीए मीटिंगला गेलो होतो तेव्हा तर 30-35 चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडी होती असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे.

महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रमुख पक्ष आहेत. यापैकी राष्ट्रव काँग्रेसचा एक प्रेमळ आक्षेप सुरुवातीला होता, पण तो गैरसमज मी मध्ये भेटल्यानंतर दूर झालेला आहे आणि तो आक्षेप अगदी तीव्र नव्हता. तसेच महाविकास आघाडीत कुरबुरी नाहीत असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

COMMENTS