मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक !

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर या बैठकीचं आयोजन केलं आहे. काही मंत्री ऑनलाईन तर काही वर्षा बंगल्यावर उपस्थित रहाणार असल्याची महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.या खास बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या निर्णयांवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान या बैठकीत नेमका काय विषय आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. राज्यात कोरोनाच्या काळात उद्धव ठाकरेंची ही आढावा बैठक असल्याची माहिती समोर येत आहे. यानुसार, सर्व महत्त्वाच्या विषयांवर आणि सर्व खात्यांवर प्रत्येक मंत्र्याशी उद्धव ठाकरे संवाद साधणार आहेत. त्यामुळे यात कोरोनाच्या संबंधीत आणि लॉकडाऊन संदर्भात काय चर्चा होते हे पाहणं गरजेचं आहे.

COMMENTS