बलात्काराच्या आरोपींना 100 दिवसांत फाशी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागवला अहवाल !

बलात्काराच्या आरोपींना 100 दिवसांत फाशी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मागवला अहवाल !

मुंबई – राज्यातील बलात्काराच्या आरोपींना 100 दिवसांत फाशी दिली जावी असा प्रस्ताव शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडला आहे. या प्रस्तावाची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला असल्याची माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. सध्या विधीमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. जलद कामगिरी केली तर या अधिवेशनातही विधेयक संमत केलं जाऊ शकतं असंही प्रताप सरनाईक म्हणाले आहेत.

दरम्यान महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्रप्रदेश सरकार नवीन कायदा आणण्याची तयारी करत आहे. या कायद्याअंतर्गत बलात्कार करणाऱ्या आरोपींना 21 दिवसांच्या आत फाशीची शिक्षा होणार आहे.आंध्रप्रदेशच्या मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे.या विधेयकात विशेष बाब म्हणजे एफआयआर दाखल केल्यानंतर २१ दिवसांत ट्रायल पूर्ण करून फाशीची शिक्षा देण्यात येणार असल्याची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४मध्ये दुरूस्ती करून नवे ३५४ ई कलम तयार करण्यात आले आहे. भारतीय कायद्यानुसार बलात्काराच्या आरोपात दोषी सिद्ध झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेची तरतूद नाही. हे विधेयक मंजूर झाल्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा देणारे आंध्रप्रदेश हे पहिले राज्य ठरणार आहे.त्यानंतर राज्यातही या विधेयकाला मंजुरी दिली तर महाराष्ट्र हे दुसरं राज्य ठरणार आहे.

COMMENTS