‘या’ जिल्ह्यातील उद्योगांना परवानगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा!

‘या’ जिल्ह्यातील उद्योगांना परवानगी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा!

मुंबई – ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांतील उद्योगांना परवानगी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 20 तारखेपासून काही प्रमाणात परवानगी दिली जाणार असून ऑरेंज झोनमध्ये कोरोनाचा प्रभाव मध्यम असलेले जवळपास 18 जिल्हे आहेत. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर आतापर्यंत कमी कोरोना रुग्ण आढळलेल्या जिल्ह्यांचा समावेश ग्रीन झोनमध्ये करण्यात आला आहे. राज्यात 9 असे जिल्हे आहेत जिथं अजुन कोरोनाचा फारसा प्रभाव नाही. यामध्ये धुळे, नंदूरबार, सोलापुर, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील उद्योगांना सुरुवात होणार आहे.

दरम्यान शेती, जीवनावश्यक गोष्टी याच्यामध्ये अडचण येणार नाही. जिल्ह्याच्या वेशी आपण उघडणार नाहीत. जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच वाहतुकीला परवानगी असून 3 मे पर्यंत हे बंधन आपल्याला पाळायचं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

तसेच राज्यात रेड झोनमध्ये 8 जिल्हे आहेत. यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, नागपूर, रायगड, सांगली आणि औरंगाबाद यांचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे या दोन जिल्ह्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे याठिकाणी लॉकडाऊन  तसाच राहणार आहे.

COMMENTS