उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर या नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ!

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर या नेत्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ!

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे 29 वे मुख्यमंत्री ठरले आहेत. शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. या सोहळ्यासाठी राज्यातील आणि देशातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांच्यानंतर शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनीही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते आठ वेळा आमदार झाले आहेत. थोरात यांच्यानंतर काँग्रेसकडून डॉ. नितीन राऊत यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

COMMENTS