मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र, केली ‘ही’ मागणी!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र, केली ‘ही’ मागणी!

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांना पत्र पाठवलं आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा जीएसटीचा वाटा मिळावा अशी मागणी केली आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला 15 हजार 558 कोटी 5 लाख रुपये कर परताव्यापोटी येणे बाकी आहेत. हा परतावा कमी झाल्यामुळे राज्यातील विकास कामांवर परिणाम होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे 14 टक्के जीएसटी संकलनाच्या उद्दिष्टापेक्षा कमी कर संकलन झाले आहे. चालू आर्थिक वर्षात पहिल्या चार महिन्यात राज्याला 5 हजार 635 कोटी रुपये इतका जीएसटी मोबदला मिळाला. मात्र नोव्हेंबर 2019 मध्ये अद्यापही 8 हजार 611 कोटी 76 लाख इतकी रक्कम जीएसटी मोबदल्यापायी मिळणे बाकी आहे.

तसेच वस्तू व सेवा कर प्रणाली 2017-18 मध्ये निश्चित करण्यात आली. त्यावेळी त्याचा आधार वित्त आयोगाचे कर परतावा सूत्र होते. मार्च 2018 या वर्षाअखेर 2019 च्या कॅग अहवाल क्र.11 नुसार एकात्मिक वस्तू व सेवा कराची समायोजित रक्कम अनेक व्यवहारांसाठी झालेली नाही असे आढळले. यामुळे या कराची मोठी रक्कम केंद्राकडून येणे बाकी आहे. ही रक्कम लवकरात लवकर देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

COMMENTS