‘त्या’ फ्लॅटमुळे आमदार बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल !

‘त्या’ फ्लॅटमुळे आमदार बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल !

अमरावती – आमदार बच्चू कडूंच्या अडचणी वाढ झाली असून 2014 मधील विधानसभा निवडणूक लढवताना मुंबईतील मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली नसल्याचा आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्चू कडू यांनी मुंबईतील 42 लाख 46 हजार रुपयांचा मालकीचा फ्लॅट असल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली नसल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

आमदार बच्चू कडू यांनी मुंबई म्हाडाकडून 2011 मध्ये 42 लाख 46 हजार रुपयांत हा फ्लॅट विकत घेतला असल्यची माहिती आहे. 19 एप्रिल 2011 रोजी त्या फ्लॅटचा ताबा आमदार कडू यांनी घेतला होता. परंतु निवडणुकीचा अर्ज भरताना त्यांनी ही माहिती लपवली असल्याची तक्रार चांदूरबाजार नगरपरिषदेचे नगरसेवक गोपार तिरमारे यांनी पोलिसांकडे केली होती. याबाबत पोलिसांनी माहिती अधिकार कार्यद्याअंतर्गत माहिती काढून बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान बच्चू कडू यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले असून कर्जाची परतफेड करु न शकल्यानं तो फ्लॅट विकला असल्याची माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे. राजयोग सोसायटीने सर्व आमदारांना घरसोबत बॅंकेचे 40 लाख रुपये कर्ज उपलब्ध करून दिले होते, परंतु कर्जाची परतफेड करू न शकल्यामुळे हे घर विकून टाकले असल्याचं ते म्हणाले आहेत.

 

COMMENTS