अभिनेत्री कंगना राणौवतविरोधात गुन्हा दाखल, कोणी आणि का केली तक्रार पाहा ?

अभिनेत्री कंगना राणौवतविरोधात गुन्हा दाखल, कोणी आणि का केली तक्रार पाहा ?

मुंबई – अभिनेत्री कंगना राणौवतविरोधात विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत बॉलीवूड माफियांशी संबंध असल्याचे वक्तव्य करून बदनामी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा बांधकाम तोडण्याशी कुठलाही थेट संबंध नसताना ट्विटवर व्हिडिओ अपलोड करून मुख्यमंत्र्यांवर आरोप करून बदनामी केल्याचा आरोप अॅडव्होकेट नितीन माने यांनी केला आहे. याप्रकरणी विक्रोळी कोर्टातही अब्रूनुकसानीचा खटला कंगनाविरोधात चालवला जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS