मोदी सरकारविरोधात पहिल्यांदाच अविश्वास प्रस्ताव, उद्धव ठाकरे पाठिंबा देणार ?

मोदी सरकारविरोधात पहिल्यांदाच अविश्वास प्रस्ताव, उद्धव ठाकरे पाठिंबा देणार ?

नवी दिल्ली – संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून अधिवशनाच्या पहिल्याच दिवशी टीडीपीनं मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला आहे. या प्रस्तावाला काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला असल्यामुळे या प्रस्तावाला पन्नासहून अधिक खासदारांचा पाठिंबा मिळाला आहे. त्यामुळे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करुन घेतला. मोदी सरकावर पहिल्यांदाच अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान या ठरावाबाबत शिवसेनेनं आपली भूमिका अजूनपर्यंत मांडली नसल्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे. अविश्वास ठरावाला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबतचा अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेणार आहेत. अनेकवेळा शिवसेनेकडून मोदी सरकारवर जारीर टीका करण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे विरोधकांना पाठिंबा देतील असं बोललं जात आहे. परंतु दुस-या बाजूला ते भाजपला साथ देतील असंही बोललं जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान या प्रस्तावावर शुक्रवारी चर्चा होणार असल्यामुळे शुक्रवारचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. भाजपाचे लोकसभेत 273 खासदार आहेत. मित्रपक्षांच्या खासदारांचा आकडा विचारात घेतल्यास ही संख्या 310 वर जाते. लोकसभेतील भाजपाचं संख्याबळ पाहता मोदी सरकारवर या अविश्वास ठरावाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं दिसत आहे.

COMMENTS