भाजपचे 25 आमदार आमच्या संपर्कात, काँग्रेस नेत्याचा दावा !

भाजपचे 25 आमदार आमच्या संपर्कात, काँग्रेस नेत्याचा दावा !

नवी दिल्ली – भाजपचे 25 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेसचे नेते आणि मंत्री पी. सी. शर्मा यांनी केला आहे.
भाजपचे 25 आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत. 23 मे रोजी लोकसभेचे निकाल जाहीर होतील. भाजप केंद्रात सत्ता प्रस्थापित करु शकले नाही तर ते आमच्यासोबत येतील, असा विश्वास शर्मा यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजप केंद्रात सत्ता प्रस्थापित करु शकले नाही तर भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे. तसेच भाजपचे हे 25 आमदार कोण आहेत याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान एक्झिट पोल हे पूर्वीही खोटे ठरले असून 23 मे रोजी देखील सर्व एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरतील, असंही शर्मा म्हणाले आहेत.मध्य प्रदेशमधील सरकार अल्पमतात आहे असा दावा भाजपने केला होता. त्यानंतर आता भाजपचे थ आमदार काँग्रेसच्या संपर्कात असल्याचा दावा विश्वास शर्मा यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

COMMENTS