काँग्रेसची विधानसभेसाठी पहिली यादी, 60 नेत्यांची नावे निश्चित!

काँग्रेसची विधानसभेसाठी पहिली यादी, 60 नेत्यांची नावे निश्चित!

नवी दिल्ली – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणूक तोंडावर आल्यामुळे उमेदवारांची नावे लवकरच जाहीर केली जाणार आहेत. काँग्रेसनंही उमेदवारांची पहिली यादी तयार केली असून यामध्ये 60 नेत्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती आहे. ही पहिली यादी 10 सप्टेंबरला जाहीर केली जाणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत अजून जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडून नेमके कोणत्या जागेसाठी उमेदवार जाहीर केले जाणार आहेत हे दही तारखेला स्पष्ट होणार आहे.

दरम्यान आज काँग्रेस नेते ज्योतीरादित्य शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समितीची दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे देखील उपस्थित होते.
पुढील बैठक ही 10 सप्टेंबरला होणार असून या बैठकीत पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. या पहिल्या यादीत कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS