औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘यांना’ उमेदवारी निश्चित!

औरंगाबाद-जालना विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ‘यांना’ उमेदवारी निश्चित!

मुंबई – औरंगाबाद जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून बाबुराव उर्फ भवानीदास कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाबुराव कुलकर्णी हे अंबड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आहेत. तर या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांना उमेदवारी निश्चित झाल्याची माहिती आहे. त्यामुळे भवानीदास कुलकर्णी आणि अंबादास दानवे यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान औरंगाबाद-जालना या मतदारसंघाचे आमदार सुभाष झांबड यांची मुदत २९ आॅगस्टला संपत आहे. त्यामुळे रिक्त होणाऱ्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ आॅगस्ट असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ५ आॅगस्ट आहे. 19 ऑगस्टरोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर मतमोजणी २२ आॅगस्ट रोजी होणार आहे.

COMMENTS