बाळासाहेब थोरातांचा राज्यपालांवर हल्लाबोल

मुंबई – कृषी कायद्याविरोधात देशभरात शेतकरी आंदोलन करीत आहेत. दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईत सोमवारी शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आले. या आंदोलनास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला होता. आझाद मैदानात झालेल्या जाहीर सभेत शरद पवार तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सहभागी झाले होते. मोर्चाला राजभवनात जाण्यासाठी पोलिसांनी मनाई केली. तसेच राज्यपाल गोव्याला गेल्याने शेतकरी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नारजी व्यक्त केली होती. त्यावर आज काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी टिका केली.

प्रजासत्ताक दिनानिमित्त काॅंग्रेस भवनात झालेल्या कार्यक्रमानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. थोरात म्हणाले, सध्या देशात जे काय घडले ते लोकमताचा अनादार केला जात आहे. राज्य घटनेच्या मुलभूत तत्वालांना हरताल फासला जात आहे, असा हल्ला भाजप सरकारवर केला. लोकमताचा आणि सर्वसामान्यांचा आदर करणे ही जबाबदारी आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्यपालांना निर्णय घ्यायचा नव्हता. निवेदन केंद्राकडे पाठवले जाणार होते. पण ते शेतकऱ्यांशी अशापध्दतीने वागणे योग्य नाही, असेही थोरात यांनी सांगितले.

COMMENTS