कोल्हापूर – मल्लिकार्जून खर्गेंच्या भाषणादरम्यान वीज गेली, आरएसएसला लगावला टोला !

कोल्हापूर – मल्लिकार्जून खर्गेंच्या भाषणादरम्यान वीज गेली, आरएसएसला लगावला टोला !

कोल्हापूर – राज्यात भाजप सरकारविरोधात काँग्रेसनं आजपासून जनसंघर्ष यात्रा काढली आहे. या यात्रेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि पक्षाचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात मोदींचं सरकार आल्यापासून वातावरण दूषित होवू लागलं आहे. आजचे प्रधानमंत्री आग लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं खर्गे यांनी म्हटलं आहे. यादरम्यान मल्लिकार्जुन खर्गे हे भाषण करत आसताना अचानक वीज गेली. यावेळी खर्गे यांनी आरएसएसला टोला लगावला. मला वाटलं कोणी आरएसएसच्या कार्यकर्त्यानं येवून वीज बंद केली की काय असं ते म्हणाले.

तसेच सनातन संस्थेला सरकार प्रोत्साहन देत असेल तर ते प्रत्येकाने मोडुन काढायला हवं. आमची लढाई फक्त निवडणुकांसाठी नाही. तर आमची लढाई विचारधारेच्या विरोधात आहे. या देशात हिटलरशाही सुरु आहे. खोटं बोलून बोलून भाजपा सत्तेत आले.चार वर्षे आणि काही महिने झाले. परंतु देशातील तरुणांना अजुन नोकऱ्या मिळत नाहीत. सनातन संस्थेच्या कार्यकर्त्याची धरपकड सुरु आसताना. अचानक सरकार चांगल्या विचारधारेच्या लोकांना पकडत आहेत. असा आरोपही यावेळी खर्गे यांनी केला आहे.

दरम्यान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावेळी भाजप सरकावर जोरदार टीका केली आहे. राफेल व्यवहारात  कोट्यावधी  रुपये अतिरिक्त गेले तरी पंतप्रधान ना खाऊंगा ना खाने दुंगा अस म्हणतात. याला काय म्हणायचे असा सवाल चव्हाण यांनी यावेळी केला आहे. तसेच ११ एप्रिल २०११ रोजी सनातन संस्थेवर बंदी घालावी अशी मागणी केली होती. सनातन संस्थेवर बंदी घालण्यासाठी का वेळ लागतोय ? असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.

तसेच आज भाजपच्या चार वर्षाची कार्यकाल पाहिला  तर आम्हाला आत्ता म्हणायची वेळ आली आहे.. “कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा ”  तसेच सरकार झोपी गेलेल नाही. तर सरकार झोपी गेल्याचे ढोंग करत असल्याची टीकाही चव्हाण यांनी केली आहे. तसेच आमची निवडणूकीची तयारी पूर्ण झाली आहे. आम्ही कधीही निवडणुकीला सामोरे जावू शकतो असंही चव्हाण यांनी म्हटलं आहे.

 

 

COMMENTS