मोठा राजकीय भूकंप होणार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे भाजपमध्ये जाण्याचे संकेत ?

मोठा राजकीय भूकंप होणार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचे भाजपमध्ये जाण्याचे संकेत ?

अहमदनगर – आगामी काळात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले आहेत. राजकीय अन्याय होत असेल तर सरळ भाजपची वाट धरा, अन्याय करणारांना सोडचिठ्ठी देत 1999 ची पुनरावृत्ती करा विखे हाच पक्ष आहे. हे पुन्हा एकदा दाखवून द्या अशी मागणी राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे जनसेवा मंडळाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

दरम्यान दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये मोठा तिढा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आज कार्यकर्त्यांनी विखे-पाटील यांच्याकडे भाजपमध्ये जाण्याची मागणी केली आहे. प्रवरानगर येथे घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्ह्यातील जनसेवा मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी या कार्यकर्त्यांन समोरुन आडकाठी होत असेल तर आपली ताकद दाखवून द्या.

एक तर भाजपमध्ये जा किंवा अपक्ष लढा अशी जाहीर मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यानंतर विखे पाटील यांनीही पक्षाने न्याय दिला नाही तर आपण कार्यकर्त्यांबरोबर राहू असं सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी काळात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS