आजचा काँग्रेस आमदरांचा भाजप प्रवेश बारगळला, फक्त पडाळकर करणार प्रवेश ?

आजचा काँग्रेस आमदरांचा भाजप प्रवेश बारगळला, फक्त पडाळकर करणार प्रवेश ?

मुंबई – आज या विधानसभा निवडणुकीपुर्वीची शेवटची मेगा भरती भाजपमध्ये होणार  होती. यामध्ये काही विद्यमान आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार होते. काँग्रेसमधले तब्बल 7 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार होते. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाचे आमदार आणि बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांचाही समावेश होता. भाजपकडून ते पुन्हा चिखली मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे चिखलीतून लढणार असंही बोललं जात होतं. मात्र बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाला मतदारसंघातून जोरदार विरोध आहे.

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटचे काँग्रेस आमदार सिद्धराम म्हेत्रे,  मुंबईतील मालाडचे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख ,  विदर्भातील गोंदियाचे काँग्रेस आमदार गोपालदास अग्रवाल, याशिवाय धुळे जिल्ह्यातील शिरपुर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा, साक्रीचे काँग्रेस आमदार डि एस अहिरे, आणि पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत भालके हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र बोलणी कशावरुन तरी फिस्कटल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचा आज भाजप प्रवेश होणार नाही अशी माहिती मिळत आहे. नेमकी कोणत्या कारणामुळे भाजप प्रवेश झाला नाही याचं कारण अजून समजू शकलं नाही. काँग्रेसचे हे सात आमदार भाजपच्या वाटेवर असल्याच्याा चर्चेमुळे काँग्रेसनं जारी केलेल्या पहिल्या यादीत त्यांची नावे नाहीत. आज केवळ वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडाळकर यांचाच भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे.

COMMENTS