राज्यात काँग्रेस-भाजप एकत्र?, ‘या’ दोन नेत्यांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण!

राज्यात काँग्रेस-भाजप एकत्र?, ‘या’ दोन नेत्यांच्या भेटीमुळे चर्चेला उधाण!

मुंबई – राज्यात काँग्रेस-भाजप एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. कारण काँग्रेस नेते अहमद पटेल आणि नितीन गडकरी यांच्यात झालेल्या भेटीमुळे राजकीय या चर्चेला उधाण आलं आहे. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेसाठी आता राजधानी दिल्लीतही राजकीय हालचालींना वेग आला असल्याचं दिसत आहे. तर दुसय्रा बाजूला शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात बैठक सुरु आहे. त्यामुळे सत्तास्थापनेवरुन राज्यात आता राजकीय वातावरण चांगलच तापलं असल्याचं दिसत आहे.

दरम्यान अहमद पटेल हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. सोनिया गांधींनंतर ते पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. बहुतांश सगळेच निर्णय त्यांच्या सल्ल्याने घेतले जातात. त्यामुळे त्यांची नितीन गडकरी यांच्यासोबत झालेली बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 14 दिवस उलटले तरी सत्ता स्थापनेचा मुहूर्त सापडलेला नाही. 9 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होणार आहे. परंतु अजूनही शिवसेना आणि भाजप यांच्यातील चर्चा मुख्यमंत्रीपदावरुन अडली आहे. तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात अशीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे पुढे काय होणार याची उत्सुकता राज्यातील जनतेला लागली आहे.

COMMENTS