काँग्रेसचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी !

काँग्रेसचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या भेटीला, मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी !

नवी दिल्ली – काँग्रेसच्या शिष्टमंडळाने दिल्लीत जाऊन केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांवर आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या शिष्टमंडळानं केली असून भाजपचे पालघरचे नवनियुक्त खासदार राजेंद्र गावित यांच्या खर्चाचा तपशीलही जारी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे.पालघर निवडणुकीत मुख्यमंत्र्यांकडून साम दाम दंड भेदची भाषा करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडून सत्तेचा दुरूपयोग केला जात असून मुख्यमंत्र्यांनी दादागिरी केली असल्याचा आरोपही काँग्रेसनं केला आहे.

दरम्यान आचारसंहितेचा भंग केला तरीही गुन्हा दाखल केला नाही. तसेच अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्या होत्या. या निवडणुकीदरम्यान भाजप उमेदवाराचा खर्च दीड कोटी झाला असून त्यांनी खर्च दाखवला नाही. तसेच अधिकारी सत्तेच्या दबावाखाली काम करत असल्याचंही काँग्रेसनं म्हटलं आहे. तसेच यावेळी निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी दिली आहे.

COMMENTS