‘ती’ घोषणा ऐकून कार्यकर्त्यावर चिडले दिग्विजय सिंह, “पुन्हा अशी घोषणा दिलीस तर नदीत बुडवेन !”

‘ती’ घोषणा ऐकून कार्यकर्त्यावर चिडले दिग्विजय सिंह, “पुन्हा अशी घोषणा दिलीस तर नदीत बुडवेन !”

भोपाळ – एका यात्रेदरम्यान आपल्या कार्यकर्त्यानं दिलेल्या घोषणेनंतर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांचा राग अनावर झाला असल्याचं पहावयास मिळालं आहे. काँग्रेसच्या एका वृद्ध कार्यकर्त्यानं ‘दिग्गी राजा जिंदाबाद’ अशी घोषणा दिली. मात्र, ही घोषणा ऐकून दिग्विजय सिंह यांना प्रचंड राग आला. त्यांनी जवळ जाऊन संबंधित कार्यकर्त्याला चांगलेच झापले. पुन्हा अशी घोषणा दिलीस तर तुला इथेच नदीत बुडवेन, असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर दिग्विजय सिंहांचा हा रुद्रावतार पाहून कार्यकर्ता चांगलाच घाबरला व त्याने कान पकडून दिग्विजय सिंह यांची माफी मागितली. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दरम्यान मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून राज्यात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी शुक्रवारपासून एकता यात्रेला सुरुवात केली आहे. ओरछा येथून या यात्रेला सुरुवात झाली आहे. या यात्रेदरम्यान एका वृद्ध कार्यकर्त्यांनं दिग्गी राजा जिंदाबाद अशा घोषणा दिल्या परंतु या घोषणेनंतर दिग्विजय सिंह यांना राग आला असल्याचं दिसून आलं आहे.

COMMENTS