सांगली – काँग्रेसच्या ‘त्या’ आक्षेपामुळे मतदान केंद्रावर गोंधळ !

सांगली – काँग्रेसच्या ‘त्या’ आक्षेपामुळे मतदान केंद्रावर गोंधळ !

सांगली – सांगली महापालिकेसाठी आज मतदान पार पडलं. या मतदानादरम्यान काँग्रेसनं घेतलेल्या आक्षेपामुळे प्रभाग क्रमांक 15 मध्ये मोठा गोंधळ पहायला मिळाला. काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन दाबले तरी भाजपला मतदान होत असल्याचा संशय काँग्रेसनं घेतला. त्यामुळे काही काळासाठी मतदान प्रक्रियाही थांबवण्यात आली. परंतु निवडणूक अधिका-यांच्या तपासणीनंतर मशीनमध्ये कोणताही बिघाड नसल्याचं समोर आलं.

दरम्यान काँग्रेसनं घेतलेल्या या आक्षेपामुळे प्रशासनाची मोठी धापवळ झाली असल्याचं पहावयास मिळालं आहे. काँग्रेस उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर धाव घेतल्यामुळे याठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत पहायला मिळाली असून या निवडणुकीच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

COMMENTS