सांगली – काँग्रेसचे माजी आमदार धत्तुरे काळाच्या पडद्याआड, वाढदिवसाच्या दिवशीच घेतला अखेरचा श्वास !

सांगली – काँग्रेसचे माजी आमदार धत्तुरे काळाच्या पडद्याआड, वाढदिवसाच्या दिवशीच घेतला अखेरचा श्वास !

सांगली – काँग्रेसचे मिरजचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांच निधन झालं. काल रात्री जेवताना ठसका लागला त्यानंतर त्यांना छातीत दुखु लागल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना मिरजेच्या मिशन रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं. ते 73 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे, त्याचं दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मिरज विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडून आले होते. मिरज मतदार संघातून 1999 आणि 2004 साली ते सलग दोन वेळा निवडून आले होते. धत्तुरे यांची काँग्रेसचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते अशी ओळख होती. अत्यंत साध्या राहणीमानामुळे परिसरात चांगलेच प्रसिद्ध होते. ते राजकारणात आल्या पासून म्हणजेच आमदारकी पासून आज पर्यंत त्यांच्यावर कोणताही आरोप झाला नाही, त्यांची स्वच्छ कारकीर्द राहिली. दोनदा आमदार व्होवून ही त्यांची साधी राहणी होती. आमदार की नंतर ते बऱ्याच वेळा रिक्षातून ही प्रवास करत.

धत्तूरे हे मुळ बेकरी व्यावसायिक होते. ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनाझेशन मार्फत त्यांना काँग्रेस कडून उमेदवारी मिळाली, आणि 1999 ची त्यांनी पहिलीच निवडणूक जिंकली. त्यांच्या प्रचारासाठी हिंदी चित्रपट क्षेत्राचे अभिनेते दिलीपकुमार हे मिरजेत आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी धत्तुरे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

COMMENTS