राष्ट्रवादीला वगळून गुजरातमध्ये काँग्रेसची महाआघाडी ?

राष्ट्रवादीला वगळून गुजरातमध्ये काँग्रेसची महाआघाडी ?

तीन वर्षानंतर मोदी सरकारविरोधात सुरू झालेली नाराजी, पोटनिवडणुकीतील सरकारविरोधातील कौल हे मुद्दे इनकॅश करण्यासाठी गुजरातमध्ये काँग्रेसने महाआघाडी स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाचे गुजरात प्रभारी अशोक गेहलोत आणि गुजरातमधील पक्षाचे नेते भरतसिंग सोलंकी हे यासंदर्भात चर्चा करत आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.  येत्या डिसेंबरमध्ये गुजरात विधानसभेची निवडणूक आहे.

पाटीदार समजाचा नेता हार्दिक पटेल, संयुक्त जनता दलाचे बंडखेर नेते आमदार छोटू वासवा, दलित समजाचे नेते जिग्नेश मेवानी, ओबीसी नेते अल्पेश ठाकूर यांना या महाआघाडीत घेतलं जाण्याची शक्यता आहे. या सर्व नेत्यांशी चर्चा सुरू असल्याचं काँग्रेसच्या नेत्याने इंडिया टुडेशी बोलताना स्पष्ट केलं. हार्दिक पटेल या तरुण नेत्याने पटेलांचे आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. पटेल समाजाचा मोठा घटक हार्दिक सोबत आहे. छोटू वासवा हे आदिवासी समाजाचे नेते आहेत. त्यांची आदिवासी समाजामध्ये चांगली ताकद आहे. तर जिग्नेश मेवानी यांनी दलित समाजाचं गुजरातमध्ये चांगलं संघटन केलं आहे. तर अल्पेश ठाकूर हे ओबीसी समजाचे नेते आहेत.  अशी महाआघाडी अस्तित्वात आी तर गुजरातमध्ये भाजची अडचण होऊ शकते अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

महाआघाडीमध्ये या चार नेत्यांची  आणि पक्षांची नावे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठेही उल्लेख नाही. त्यामुळे गुजरातच्या या महाआघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस नसण्याची शक्यता आहे.

COMMENTS