पंजाब- लुधियाना महापालिकेत भाजप-अकालीचा सुपडासाफ, काँग्रेसनं मारली बाजी !

पंजाब- लुधियाना महापालिकेत भाजप-अकालीचा सुपडासाफ, काँग्रेसनं मारली बाजी !

चंदिगड – महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला अतिआत्मविशावस नडला असल्याचं पहावयास मिळालं आहे. कारण काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारत पंजाबमधील लुधियाना महानगरपालिकेत भाजप-अकाली दलाचा धुव्वा उडवला आहे. पंजाबमधील लुधियाना महानगरपालिका निवडणुकीचे निकाल घोषित करण्यात आले असून या निवडणुकीत काँगेसने भाजप, शिरोमणी अकाली दल यांना जोरदार धक्का दिला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला ६२ प्रभागांमध्ये यश मिळवता आलं आहे तर भाजपला १० जागा तर अकाली दलाला ११ जागांवर विजय मिळता आला आहे.

दरम्यान या निवडणुकीत लोक इन्साफ पार्टी सात, आम आदमीला एका जागेवर विजय मिळाला आहे. तसेच एका अपक्ष उमेदवारालाही याठिकाणी यश आलं असून लुधियाना नगरपालिकेच्या ९५ जागांसाठी २४ फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले होते.

COMMENTS