काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण, स्वत: ट्वीट करुन दिली माहिती!

काँग्रेसच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण, स्वत: ट्वीट करुन दिली माहिती!

नवी दिल्ली – राज्यासह देशभरात कोरोनाचं थैमान पहायला मिळत आहे. सामान्यांसह काही राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेस नेते आणि प्रवक्ते संजय झा यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द संजय झा यांनी ट्विट करून कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. कृपया एकमेकांना संक्रमण व्हायच्या धोक्याला कमी लेखू नका. आपण सगळेच असुरक्षित आहोत. स्वत:ची काळजी घ्या,’ असं ट्विट संजय झा यांनी केलं आहे.

दरम्यान संजय झा यांना कोरोना झाला असला तरी त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. याबाबतही त्यांनी या ट्वीटमध्ये माहिती दिली असून ‘माझी कोरोनाची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. माझ्यात कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नाहीयेत, त्यामुळे पुढचे १०-१२ दिवस मी घरातच क्वारंटाईनमध्ये राहणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

COMMENTS