राष्ट्रवादीचे आमदार पांडूरंग बरोरा यांच्यासह काँग्रेसच्या ‘या’ दोन नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश!

राष्ट्रवादीचे आमदार पांडूरंग बरोरा यांच्यासह काँग्रेसच्या ‘या’ दोन नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पार्टीला जोरदार धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे शहापूरचे आमदार पांडूरंग बरोरा यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना भवन येथे पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडला आहे. तसेच बरोरा यांच्यासह पालघरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष केदार काळे आणि राज्य युवक काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद दुबे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे पालघरमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.

दरम्यान शहापूरची तहान भागवण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला असल्याच बरोरा यांनी म्हटलं आहे. तसेच मुंबईची खरी लाईफलाईन शहापूर तालुका आहे. तीन पिढ्या शरद पवारांसोबत गेल़्या पण काळानुसार आता जावं लागतंय. एकनाथ शिंदेंनी सर्वाधिक निधी माझ्या तालुक्याला दिला. तालुक्यात एमआयडीसी होण्यासाठी प्रयत्नशील आहे. एमएमआरडीएचा विस्तार शहापूरपर्यंत व्हावा, यासाठी प्रवेश केला आहे. तसेच शहापूर तालुका टंचाईमुक्त आणि भगवायुक्त करणार असल्याचंही बरोरा यांनी म्हटलं आहे.

COMMENTS