काँग्रेसला धक्का, ‘या’ चार नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश!

काँग्रेसला धक्का, ‘या’ चार नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश!

मुंबई – आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेनं जोरदार धक्का दिला आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा पंचायती समितीचे सभापती सतीश पाटील उमरेकर, काँग्रेसचे बारडमधील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक बाळासाहेब देशमुख बारडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी उपाध्यक्ष तथा उस दर नियंत्रण मंडळाचे सदस्य प्रल्हाद इंगोले, माजी जि.प.सदस्य मनसेचे पदाधिकारी रविंद्र नादरे गिरगावकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.
यावेळी खासदार हेमंत पाटील, संपर्कप्रमुख आनंदराव जाधव, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हाप्रमुख आनंदराव पाटील बोंढारकर, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, शहरप्रमुख सचिन किसवे, माजी जि.प.सदस्य नागोराव इंगोले, माणिक लोमटे, भागवत कऱ्हाळे, दीपक पाटील, गणपत शिंदे नागेलीकर, गजानन शिंदे, माधव खांडरे, अनुराम नादरे, सचिन बाभळे हे उपस्थित होते.

दरम्यान लोहा पंचायत समितीचे सभापती सतीश पाटील उमरेकर यांनी आपण एकनिष्ठपणे काम करू व शिवसेना संघटना बांधणीसाठी पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणेच काम करणार असल्याचा विश्वास दिला. या सर्व नेत्यांच्या प्रवेशामुळे नांदेड जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली असल्याचं दिसत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे
नेते अशोक चव्हाण यांना मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

COMMENTS