आघाडीत सहभागी होण्यासाठी भारिपला काँग्रेसचं निमंत्रण, काँग्रेस नेते आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये चर्चा !

आघाडीत सहभागी होण्यासाठी भारिपला काँग्रेसचं निमंत्रण, काँग्रेस नेते आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये चर्चा !

मुंबई – आगामी निवडणुकांसाठी आघाडीत सहभागी होण्यासाठी भारिप बहूजन महासंघाला काँग्रेस नेत्यांनी निमंत्रण दिलं असल्याची माहिती आहे. देशातील स्थिती लक्षात घेता काँग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहण्याचे आंबेडकर यांनी संकेत दिले होते. त्यानंतर आंबेडकरांनी भूमिका मांडल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी तात्काळ प्रकाश आंबेडकरांळी संपर्क साधला आहे.

दरम्यान आगामी निवडणुकीत आघाडी करण्यासंदर्भात काँग्रेस व भारिप-बहुजन महासंघाची काँग्रेस नेत्यांसोबत मुंबईत चर्चा झाली. काँग्रेसतर्फे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, वरिष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांनी केली प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा केली आहे. तसेच या बैठकीत आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघाने काँग्रेस आघाडीत सहभागी व्हावे असे काँग्रेसकडून निमंत्रण दिले असल्याची माहिती आहे.

COMMENTS