काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भाजपमध्ये जाणार ?

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यानं घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, भाजपमध्ये जाणार ?

मुंबई – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आणखी एक नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. कारण मुंबई काँग्रेसमधील माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते कृपाशंकर सिंग यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. गणेश दर्शनाच्या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. परंतु ते भाजप प्रवेशाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहो. त्यामुळे कृपाशंकर सिंग यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर त्यांना मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान यापूर्वी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारची स्तुती करत काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे यापूर्वीच कृपाशंकर सिंग यांनी भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते. तसेच काही दिवसांपूर्वी कृपाशंकर सिंह यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांची गुप्त भेट घेतली होती. या बैठकीत आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय पुनर्वसनासंदर्भात चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. त्यानंतर आता गणेश दर्शनाच्या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS