काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या !

काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या !

नवी दिल्ली – काँग्रेस नेत्याची गोळ्या घालून हत्या केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हरियाणातील फरिदाबाद येथे काँग्रेस प्रवक्ते विकास चौधरी यांच्यावर अज्ञातांनी गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर नेमके कोण होते याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. काँग्रेस नेत्यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला आहे. हरियाणाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांनी सध्या राज्यात जंगलराज असल्याची टीका केली आहे.

दरम्यान विकास चौधरी आपल्या कारमधून प्रवास करत असताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला आहे. ते गाडीत बसले असताना त्यांच्यावर आठ ते दहा गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांना जखमी अवस्थेत स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.या घटनेमुळे
फरिदाबाद येथे तणावपूर्ण वातावरण पहायला मिळत आहे.

COMMENTS