काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ नेता काढणार नवा पक्ष?

काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का, ‘हा’ नेता काढणार नवा पक्ष?

नवी दिल्ली – काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी पक्षाची साथ सोडली. पक्षातून बाहेर पडलेल्या काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु आता काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. कारण हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते भूपेंद्रसिंह हुड्डा हे नवा पक्ष काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हुड्डा यांनी पक्ष काढला तर हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

दरम्यान भूपेंद्रसिंह हुड्डा यांनी काल दिल्लीत काँग्रेसच्या अनेक आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. तसेच ते लवकरच आपल्या कार्यकर्त्यांची जाहीर सभा घेणार असल्याची माहिती आहे. या सभेत ते नव्या पक्षाची घोषणा करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हुड्डा यांच्या आगामी भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS