अधिवेशनात भाजपमध्ये मोठा भूकंप होणार?, काँग्रेस नेत्यानं वर्तवलं भाकीत!

अधिवेशनात भाजपमध्ये मोठा भूकंप होणार?, काँग्रेस नेत्यानं वर्तवलं भाकीत!

नवी दिल्ली – महाविकासआघाडी सरकारचे पहिले हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. या अधिवेशनादरम्यान भाजपमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी वर्तवली आहे. भाजपपासून बहुजन समाजाच्या नेत्यांचा उत्साह कमी झाला आहे. कुठे तरी आज खदखद बाहेर येत आहे. त्यामुळे नागपूर अधिवेशनाचा इतिहास पाहिला तर भाजपमध्ये मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान मागील काही वर्षामध्ये राज्यामध्ये ओबीसींची अनेकं आंदोलनं झाली. ओबीसीचे अनेक प्रश्न मांडण्यात आले. पण त्यांना फडणवीस सरकारने न्याय दिला नाही. विधानसभा निवडणुकीत ओबीसी नेत्यांना भाजपच्या नेत्यांनी टार्गेट केलं. त्यांना तिकीटं देण्यात आली नाही. एवढंच नाहीतर त्यांना पराभूतही करण्यात आलं. त्यामुळेच आज खदखद बाहेर पडत आहे, असा दावा राऊत यांनी केला.

COMMENTS