आगामी पंतप्रधान राहुल गांधी नाही तर ‘हे’ असणार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा !

आगामी पंतप्रधान राहुल गांधी नाही तर ‘हे’ असणार, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा दावा !

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं देशभरातील अनेक विरोधी पक्षांना एकत्रित घेऊन महाआघाडीची स्थापना केली आहे. तसेच महाआघाडीकडून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं नाव पंतप्रधानपदासाठी आघाडीवर आहे. परंतु काँग्रेस नेत्यानं केलेल्या वक्तव्यामुळे सध्या खळबळ उडाली आहे. देशाचे आगामी पंतप्रधान हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नाही तर मायावती असतील असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांनी केला आहे. आगामी निवडणुकीत महाआघाडीचा विजय होईल आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या पंतप्रधान पदाच्या दावेदार असतील, असं नटवर सिंह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मायावतींचे नाव सर्वांत पुढे राहील. आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या जागांमध्ये दुपटीने वाढ होत काँग्रेस 90 जागापर्यंत मजल मारील असंही नटवर सिंह यांनी म्हटलं आहे.अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद पाहता काँग्रेसचे सरकार जास्त दिवस टिकू शकणार नाही.

तसेच सोनिया गांधी यांच्यामुळे पक्षात एकजूट कायम आहे. त्यांच्यानंतर पक्षात फूट पडणार हे निश्चित आहे, अशी भविष्यवाणीही त्यांनी नटवर सिंह यांनी केली आहे. अल्वर येथील रामगड विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकिटावर नटवर सिंह यांचा मुलगा जगत सिंह निवडणूक लढवत आहे. त्याच्या प्रचारासाठी आल्यानंतर नटवर सिंह बोलत होते.

 

COMMENTS