काँग्रेसच्या अध्यक्षपदावर ‘या’ नेत्यानं केला दावा !

काँग्रेसच्या अध्यक्षपदावर ‘या’ नेत्यानं केला दावा !

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी घेत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. महिन्याभरात पर्याय शोधा असं त्यांनी ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं होतं. परंतु सर्वच नेत्यांनी त्यांना पदावर राहण्याचा आग्रह धरला. मात्र राहुल गांधी आपल्या निर्णयावर अजूनही ठाम आहेत. गांधी कुटुंबाशीवाय कुणी हे पद सांभाळण्यासाठी पुढं आलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं होतं.त्यानंतर आता मध्यप्रदेशचे काँग्रेस नेते अस्लम शेरखान यांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. राहुल गांधी यांची इच्छा नसेल आणि कुणी पुढे येत नसेल तर मी हे पद सांभाळायला तयार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत त्यांनी राहुल गांधी यांना पत्रही पाठवलं आहे.

दरम्यान राहुल गांधी यांनीच पदावर राहावं अशी इच्छा आहे. मात्र त्यांची इच्छाच नसेल तर त्यांच्या इच्छेचा आदर केला पाहिजे. अन्य कुणी नेते हे पद सांभाळण्यासाठी पुढे येत नसतील तर मी हे पद सांभाळण्यासाठी तयार आहे. तसं पत्रही पाठवलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दोन वर्षांसाठी हे पद मला देऊन पाहा असंही शेरखान यांनी म्हटलं आहे.

COMMENTS