काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची सोनिया, प्रियंका गांधींवर जोरदार टीका !

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याची सोनिया, प्रियंका गांधींवर जोरदार टीका !

नवी दिल्ली – काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यानं सोनिया आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. २०१९ च्या निवडणुकांमध्ये रायबरेलीतून ना सोनिया गांधी निवडून येतील ना प्रियंका गांधी अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिनेश प्रताप सिंह यांनी केली आहे. दिनेश प्रताप सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यापूर्वी त्यांनी सोनिया गांधी आणि प्रियंका गांधींवर टीका केली आहे. तसेच काँग्रेसमध्ये माझी घुसमट वाढू लागली असून मी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देऊ केला होता मात्र प्रियंका गांधी यांनी त्याकडेही दुर्लक्ष केले. मी माझ्या राजीनाम्याबाबत प्रियंका गांधी यांना फोन केला. तेव्हा त्यांनी काँग्रेस आणि सपाची युती झाली तर तुमचा राजीनामा स्वीकारू असे म्हटले होते. त्यामुळे नाराज होऊन मी भाजपमध्ये जात असल्याचं दिनेश प्रताप यांनी म्हटलं आहे.

दरम्यान माझ्या लहान भावाला अर्थात राकेश सिंहला २०१७ च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळीच भाजपाने तिकिट देऊ केले होते. मात्र माझ्या शब्दाखातर त्याने ते घेतले नसल्याचंही दिनेश प्रताप यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या भावाला काँग्रेस पक्षाने तिकिट द्यावे अशी विनंती मी प्रियंका गांधींना केली होती. त्यांनी माझी विनंती धुडकावून लावली आणि रायबरेलीतून कोणत्याही ठाकूर समाजाच्या माणसाला तिकिट देणार नाही असे म्हटले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. काँग्रेसने सिंह यांचे आरोप  फेटाळले असून ते बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे.

 

COMMENTS