काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्यानं व्यक्त केली ठाकरे सरकारवर नाराजी !

काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्यानं व्यक्त केली ठाकरे सरकारवर नाराजी !

मुंबई – गेली काही दिवसांपासून ठाकरे सरकारवर काँग्रेस नेते नाराजी व्यक्त करत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांच्यानंतर आता राज्याचे ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही. काँग्रेसच्या बऱ्याच मंत्र्यांचा हा अनुभव आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नाराजी कळवणार आहे. काँग्रेसच्या काही आमदारांचीही नाराजी असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आज मुख्यंत्र्यांची भेट घेणार होते, परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सासरे वारल्याने काँग्रेस नेत्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक रद्द झाली आहे. पुढील बैठकीबाबत नंतर कळविण्यात येणार असल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.

काल सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला योग्य स्थान नाही, तीनही पक्षांना समान अधिकार हवेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार, असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

दरम्यान सरकारमधील वागणुकीच्या पार्श्वभूमीवर 11 जून रोजी मंत्री सुनील केदार यांच्या बंगल्यावर काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मंत्री वर्षा गायकवाड, सतेज पाटील यांच्यासह काँग्रेसचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी सरकारमध्ये काँग्रेसच्या मंत्र्यांच्या अनुभवाचा फायदा घेतला जात नाही, निर्णय प्रक्रियेत घेत नाहीत, यावर चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर मंत्री
बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली होती. पक्षांमध्ये मतभेद असतात आणि प्रत्येकाला तसा अधिकारही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांशी बोलून या सर्व गोष्टी आम्ही सोडवणार आहोत असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होत.

COMMENTS