काँग्रेसला आणखी एक धक्का, ‘या’ ज्येष्ठ नेत्यानं दिला राजीनामा!

काँग्रेसला आणखी एक धक्का, ‘या’ ज्येष्ठ नेत्यानं दिला राजीनामा!

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु झालं आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जेष्ठ नेते हरीश रावत यांनीही आज पक्षाच्या सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. पराभवाची जबाबदारी घेत आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. हरीश रावत हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं.

दरम्यान आगामी काळात महाराष्ट्र, नवी दिल्ली आणि हरियाणा या विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी काँग्रेसमध्ये बदलाचे वारे वाहत आहेत. तरूणांना संधी दिली जात असून राज्यातही काँग्रेसमध्ये मोठा बदल केला जात आहे. प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती केली जाणार असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर राज्यात काँग्रेसकडून चार कार्याध्यक्षांची नियुक्ती केली जाणार आहे. या चार नेत्यांची नावे समोर आली असून हर्षवर्धन पाटील, के. सी. पाडवी, अमित देशमुख आणि नितीन राऊत यांचं नाव जवळपास निश्चित झालं असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर काँग्रेसनं देशासह राज्यात बदल करण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे राज्यात अशोक चव्हाण यांच्या जागी बाळासाहेब थोरात तर कार्याध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील, के. सी. पाडवी, अमित देशमुख आणि नितीन राऊत यांची नियुक्ती केली जाणार आहे.

COMMENTS