कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस वाद चव्हाट्यावर, कुमारस्वामींच्या बजेटवर काँग्रेसचाच आक्षेप !

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएस वाद चव्हाट्यावर, कुमारस्वामींच्या बजेटवर काँग्रेसचाच आक्षेप !

बंगळुरू  कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस सरकारमधील वाद आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींनी सादर केलेल्या बजेटवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते एचके पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. याबाबत एचडी पाटील यांनी कुमारस्वामींना पत्र लिहिलं असून यामध्ये पाटील यांनी अल्पसंख्याक आणि राज्याच्या उत्तरेतल्या क्षेत्रासाठी निधीची मागणी केली आहे. तसेच त्यांनी माजी मुख्यमंत्री सिद्धरामैया यांना पत्र लिहून समन्वय समितीची आपत्कालिन बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस-जेडीएसमध्ये बजेटवरुन जुंपली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान सत्ता स्थापन केल्यानंतर काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसची सत्ता कोसळते की काय अशी शक्यताही वर्तवली जात होती. परंतु काँग्रेसच्या वरिष्ठांनी काही आमदारांची समजूत काढल्यानंतर वातावरण शातं झालं असल्याचं पहावयास मिळालं. परंतु पुन्हा एकदा बजेटवरुन काँग्रेसमध्ये नाराजी दिसून आली. आहे.  २०१८ सालच्या निवडणुकीमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षाला जिंकवण्यात अल्पसंख्याक समाज जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी बजेटमध्ये खास घोषणा करणं गरजेच असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे.

 

COMMENTS