काॅंग्रेसचा शिवसेनाला युपीएबाबत सल्ला न देण्याचा इशारा

काॅंग्रेसचा शिवसेनाला युपीएबाबत सल्ला न देण्याचा इशारा

मुंबई – राज्यात समान कार्यक्रमाच्या आधारे शिवसेनाला काॅंग्रेसने पाठिंबा दिला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे.  शिवसेना अजूनही युपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांनी युपीएबाबत सल्ला देऊ नये, असा इशारा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व माजी मंत्री आमदार नसीम खान यांनी शिवसेनाला दिला आहे.

दैनिक सामनाच्या आग्रलेखामध्ये शेतकरी आंदोलनवरून शरद पवार यांच्यावर स्तुतिसुमने उधळण्यात आली. तसेच काॅंग्रेस नेतृत्वावर टिका करण्यात आली. त्यामुळे काॅंग्रेस नेत्यांकडून शिवसेनेला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या टिका करण्यातआली.

अशोक चव्हाण म्हणाले, शिवसेनेशी आमची आघाडी केवळ महाराष्ट्रापुरतीच मर्यादित असून, राज्यातील आघाडी किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर झाली आहे. किमान समान कार्यक्रम प्रमाण मानून काँग्रेसने आघाडीचा महाराष्ट्रापुरता निर्णय घेतलेला आहे. शिवसेना अजूनही यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा सल्ला शिवसेनेने देणे उचित नाही.

नसीम खान म्हणाले, केंद्र सरकारने कृषी कायदा संसदेत मांडल्यापासून काॅंग्रेस पक्ष सभागृह आणि सभागृहाच्या बाहेर सुरुवातीपासून विरोध करीत आहे. त्यासाठी वेळोवेळी राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर काॅंग्रेसचे नेते रस्त्यावरही उतरले आहेत.

शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष आहे. पण अजूनही तो युपीएमध्ये सामिल झाली नाही. त्यामुळे त्यांना युपीएबाबत निर्णय किंवा सल्ला देण्याचा अधिकार नाही. याची दक्षता घ्यावी, अशा इशारा काॅंग्रेस नेते नसीम खान यांनी दिली आहे.

 

 

COMMENTS