काँग्रेसला धक्का, जिल्हाध्यक्ष भाजपच्या वाटेवर?

काँग्रेसला धक्का, जिल्हाध्यक्ष भाजपच्या वाटेवर?

पंढरपूर – विधानसभा निवडणूक संपून अवघे काही दिवस झाले आहेत. परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांमधील पक्षांतर मात्र अजून सुरुच आहे. सोलापूर जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील पानीवकर हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे. कारण पानीवकर यांची भेट मुख्यमंत्र्यांचे एस.ओ. डी. श्रीकांत भारती यांनी आज घेतली आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे. पाटील हे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांनी जर भाजपात प्रवेश केला तर काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत प्रकाश पाटील हे माळशिरस मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारापासून अलिप्त होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वीच पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. परंतु आज अखेर पानीवकर यांची भेट मुख्यमंत्र्यांचे एस.ओ. डी. श्रीकांत भारती यांनी घेतली आहे. त्यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.

COMMENTS